Thursday, September 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या

तरुण भारतbyतरुण भारत
September 3, 2026
in solapur
0
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – एल निनो च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत 189 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. परतीचा पाऊस ही पडला नाही तर चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने तालुका, मंडळ व गावनिहाय चारा उपलब्धतेचे काटेकोरपणे नियोजन करावे. चारा बियाण्यासाठी नियोजन समिती मधून अतिरिक्त एक कोटीचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येत असून जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागात एल निनो च्या संदर्भात पाणी चारा खते बियाणे या अनुषंगाने आढावा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले, उजनी धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर, एमजीपीचे अधीक्षक अभियंता अनिल पाटील, महापालिका सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे. तसेच उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात पुढील तीन महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे तर इतर तालुक्यांमध्ये पुढील चार ते पाच महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसते. परंतु पशुसंवर्धन विभागाने कृषी विभागाच्या तालुका निहाय अधिकारी यांच्या समवेत बसून तालुका, मंडळ व गावनिहाय चारा उपलब्धताची माहिती पुढील आठ दिवसात तयार करावी. तसेच चारा बियाण्यासाठी नियोजन समितीकडून तात्काळ एक कोटीचा अतिरिक्त निधी देण्यात येत असून पशुसंवर्धन विभागाने आवश्यकतेप्रमाणे अधिक निधीची मागणी नियोजन समितीला करावी असेही त्यांनी सूुचित केले.
      उजनी धरण 100% भरलेले असून उजनी धरण व्यवस्थापन विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील किती लहान व मध्यम पाणी प्रकल्पातील पाणीसाठा उजनी धरणातून भरलेला आहे याची माहिती दोन दिवसात सादर करावी. तसेच भीमा व सीना नदीवर असलेल्या बॅरेजच्या लोखंडी बर्गे दुरुस्ती साठी नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी. तर जलसंपदा विभागाने त्यांच्याकडील 39 केटीवेअर दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला सात कोटीच्या निधीची मागणी ही नियोजन समितीला करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.
     जिल्ह्यात 30 ऑगस्ट पर्यंत 189 मिलिमीटर पाऊस झालेला असल्याने कृषी विभागाने टंचाईच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील मंडळनिहाय कसा पाऊस झाला आहे त्याची माहिती द्यावी. तसेच टंचाईच्या निकषात बसणाऱ्या मंडळाची व गावांची माहिती घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.
        जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भोसले यांनी जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्याप्रमाणेच रब्बी हंगामासाठी ही पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देऊन 16 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्ह्यात 105 टक्के खरीपाची पेरणी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात 189 मिलिमीटर पाऊस झाला असून करमाळा तालुक्यात सरासरीच्या 86 टक्के तर इतर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
     पशुसंवर्धन उपायुक्त श्री विशाल येवले म्हणाले की जिल्ह्यात मोठ्या जनावरांची संख्या बारा लाख तर लहान जनावरांची संख्या आठ लाख इतकी असून प्रतिदिन बावीस हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता असून 52 लाख 400 मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणेच खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नियोजन समितीकडील दोन कोटीच्या निधीतून 7000 शेतकऱ्यांना चारा पिके घेण्यासाठी बियाणे उपलब्ध करून दिलेले आहे. हा चारा सप्टेंबर अखेरपर्यंत उपलब्ध होईल. तसेच सद्यस्थितीत तीन ते चार महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले. उजनी धरण व्यवस्थापन चे अध्यक्ष अभियंता श्री खांडेकर यांनी उजनी धरण तसेच जिल्ह्यातील विविध लहान व मध्यम पाणी प्रकल्पातील पाणीसाठा विषय माहिती बैठकीत दिली.
Post Views: 6
Previous Post

नळदुर्ग किल्ल्यावर काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईचा मृत्यू, मुलाचा अंत

Next Post

पार्क चौपाटी परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांवर आज पासून कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पार्क चौपाटी परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांवर आज पासून कारवाई

पार्क चौपाटी परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांवर आज पासून कारवाई

ताज्या बातम्या

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

September 3, 2026
मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

September 3, 2026
माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

September 3, 2026

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर

September 3, 2026
उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

September 3, 2026
रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

September 3, 2026
बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

September 3, 2026

२० सप्टेंबरपर्यंत मिळकतकरावर मिळणार सवलत

September 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1158699

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!