Thursday, September 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नळदुर्ग किल्ल्यावर काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईचा मृत्यू, मुलाचा अंत

तरुण भारतbyतरुण भारत
September 3, 2026
in crime
0
नळदुर्ग किल्ल्यावर काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईचा मृत्यू, मुलाचा अंत
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नळदुर्ग : नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी (दि. ३) काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. अंबुलगा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील अश्विनी मनोहर पौळ (वय ३०) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यातील उपली बुरुज परिसरात टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य पौळ यांचा मृत्यू झाला, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुली वीरा व क्रांती गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही मुलींवर नळदुर्ग येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पौळ या आपल्या तीन मुलांसह किल्ला पाहण्यासाठी नळदुर्ग येथे आल्या होत्या. दुपारी एक ते दोनच्या सुमारास त्या मुलांसह उपली बुरुज परिसरात गेल्या. त्यानंतर घडलेल्या या घटनेत अश्विनी आणि अजिंक्य यांचा मृत्यू झाला, तर वीरा व क्रांती गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच किल्ल्याचे इन्चार्ज नागनाथ गवळी यांनी पोलिसांना कळविले. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अख्तर सय्यद आणि बीट अंमलदार खलील शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेमागील कारणाचा शोध सुरू

अश्विनी पौळ या मुंबई येथे एमएसएफमध्ये नोकरीला होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून नोकरीचा राजीनामा दिल्याचे समजते. मागील तीन महिन्यांपासून त्या तीन मुलांसह माहेरी, व्हंताळ (ता. उमरगा) येथे राहत होत्या. त्यांचे वडील शिक्षक असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही आत्महत्या आहे की घटनेमागे अन्य काही कारण आहे, यासह सर्व शक्यता तपासल्या जात असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी किल्ला संगोपन योजनेअंतर्गत किल्ल्याची व्यवस्था युनिटी मल्टीकॉन्स कंपनीकडे असताना उपली बुरुजासह धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र, सध्या किल्ल्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे चित्र असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेमुळे नळदुर्ग शहर व परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 4
Previous Post

बापूजी नगरातील वादग्रस्त समाजमंदिर महापालिकेने घेतले ताब्यात

Next Post

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या

ताज्या बातम्या

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

September 3, 2026
मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

September 3, 2026
माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

September 3, 2026

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर

September 3, 2026
उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

September 3, 2026
रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

September 3, 2026
बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

September 3, 2026

२० सप्टेंबरपर्यंत मिळकतकरावर मिळणार सवलत

September 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1158702

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!