सोलापुर – जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवदासमय मंगल कार्यालय येथे सर्व रोग निदान तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व रोग मोफत निदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.
प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ गेली पाच वर्ष महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीदिनी समाज उपयोगी उपक्रम राबवीत असते ते कौतुकास्पद असल्याचे मत नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी व्यक्त केले
या प्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील, उत्सव अध्यक्ष प्रसाद झुंजे, ट्रस्टी कोषाध्यक्ष गणेश साखरे, नगरसेवक अविनाश पाटील, ज्ञानेश्वर कारभारी, संजय कणके आदी उपस्थित होते.


























