सांगोला – विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, रुग्णालयीन प्रशिक्षण आणि आरोग्यसेवेतील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख करून देण्यासाठी फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी आणि मोहन हॉस्पिटल, सांगोला यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य जनजागृती अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, औषधांविषयी मार्गदर्शन, चर्चासत्रे, कार्यशाळा, व्याख्याने आणि संशोधन विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या करारप्रसंगी फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ.योगेश राऊत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.चेतन पतंगे तसेच मोहन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.मकरंद मोहन येलपले उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शैक्षणिक आणि आरोग्यसेवा संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यावहारिक प्रशिक्षण मिळेल आणि भविष्यातील आरोग्यसेवेच्या आव्हानांना सामोरे जाणारे कुशल मनुष्यबळ तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Views: 5