Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

तरुण भारतbyतरुण भारत
June 24, 2026
in west maharashtra
0
सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर येऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाबरोबर जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. अद्यापही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे, पण ती खूपच तोकडी आहे. तर काहींना 1 रुपयाचीही देखील मदत मिळाला नाही.
ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना सरकारने साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यामध्ये ४७ हजार थेट स्वरुपात तर तीन लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातून देण्याचे जाहीर केले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. शासनाच्या अटी आणि शर्तीमुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली, त्यामध्ये खरवडून गेलेली जमीन नीट करणे शक्य नाही. कारण शेतात दहा दहा फुटाचे खड्डे पडलेत.
जमिनी खरवडून गेल्यामुळे नापीक बनल्या आहेत, अनेक ठिकाणी नदीची वाळू शेतात येऊन बसली आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
काही शेतकऱ्यांनी सरकारी मदतीची वाट पाहून अखेरव्याजाने पैसे काढून जमिनी नीट करण्यास सुरुवात केली आहे.
महापुरामध्ये जमिनी वाहून गेल्यामुळे आमच्या मुलांची लग्न होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. आमची जमीन बघून आलेले लोक माघारी जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्यांचं मानसिक आरोग्य देखील खचत चाललय.
सरकारने आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
१) सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात माझी साडेतीन एकर केळीची बाग आणि दोन एकर ऊस जमिनीसकट वाहून गेला होता. निर्यातक्षम केळी तयार झाली होती. विक्रीसाठी आलेली केळी महापुरानं उद्धस्थ केली. महापुरानं आमच्या तोंडचा घास हिरावल्याची भावना शंकर भरगवान लटके या शेतकऱ्याने व्यक्त केली. ज्यांच्या जमीनी खरवडून गेल्या त्यांना सरकारने साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, माझं एवढ नुकसान होऊनही सरकारची एक रुपयाची मदत देखील मला मिळालेली नाही. आता मी व्याजाने पैसे काढून माझी जमीन नीट करत आहे. सरकारच्या भरोशावर राहिलं तर खायचं काय? असा सवाल शंकर लटके यांनी केला.
….शंकर भगवान लटके, पूरग्रस्त शेतकरी केवड.
२) पूर येऊन नऊ महिने झाले. या महापुरात माझा दोन एकर उस जमिनीसकट वाहून गेला होता. एक टिपरु देखील जमिनीवर राहीलं नाही. मला सरकारची 1 रुपयाची मदत देखील मिळाली नाही. बँकेच माझ्यावर कर्ज आहे. ते कर्ज मी कसे भरायचे? असा सवाल शेतकरी जालिंदर बापू धर्मे यांनी केला आहे. आमच्यावर आत्महत्या करण्याचे वेळ आली आहे.
….जालिंदर बापू धर्मे, पूरग्रस्त शेतकरी केवड.
३) माझी पाच एकर जमीन होती. नऊ महिन्यापूर्वी सीना नदीला महापूर आला, त्यामध्ये सगळीच पाचच्या पाच एकर जमिनी वाहून गेली. या शेतात ऊस होता. ऊसासकट जमीन वाहून गेली. आता जमीन फक्त उताऱ्यावर राहिली आहे, प्रत्यक्षात शेतात काहीच नसल्याची माहिती दत्तात्रय धर्मे यांनी दिली. या नुकसानीचे मला फक्त 80 हजार रुपये मिळाले आहेत. या पैशात काहीच होणार नाही. त्यामुळं सरकारनं आम्हाला दुसरीकडे जमीन देऊन पूनर्वसन करावे. आमच्यावर आत्महत्या करण्याचे वेळ आली आहे.
….दत्तात्रय बापू धर्मे, पूरग्रस्त शेतकरी केवड.
Post Views: 182
Previous Post

संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

Next Post

कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

ताज्या बातम्या

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा धर्मादाय संस्थांना पुढे येण्याचे आवाहन #solapurnews

July 16, 2026

धनंजय मुंढे मंत्री व्हावे म्हणून केली लाडूंची तुला #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

July 16, 2026

शेगावीच्या श्री गजाननाच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

विठ्ठलाला दिल्या अहिल्यानगरच्या भक्तांने सोन्याच्या अर्धा किलोच्या पादुका #viral #marathinews

July 16, 2026

पंढरपूरात पुन्हा एफडीएची धडक कारवाई #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

अवघड आहे वृद्ध आई वडीलानाच काढले घराबाहेर #viral #marathinews #solapurnews

July 16, 2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी व संवर्धनाचा हिशोब द्या #viral

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979592

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!