सोलापूर : राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी तसेच इतर विविध परीक्षांमध्ये विशेष गुण मिळवून यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा रविवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत समृद्धी गार्डन, सदिच्छा नगर, विजापूर रोड, सोलापूर येथे होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर विनायक कोंड्याल उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गुरव समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सत्कार सोहळ्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज २८ जुलै २०२६ पर्यंत भरावेत, असे आवाहन राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नींगराज विंचूरे यांनी केले आहे.
Post Views: 20