सोलापूर : येथील पद्माकर देव सभागृहात एनएम फाउंडेशन व नागेश म्हेत्रे मित्र परिवाराच्या वतीने खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगूलवार, माजी महापौर सुधीर खरटमल, संजय हेमंगड्डी, समाज शहराध्यक्ष सैदप्पा जंगडेकर, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, नूतन नगरसेवक नरसिंह आसादे, ऋषिकेश म्हेत्रे, यल्लाप्पा बुगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात खासदार डॉ. वाघमारे यांच्या हस्ते समाजातील नूतन नगरसेवक व अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पल्लोलू यांचाही सत्कार करण्यात आला.
Post Views: 20