भंडारा शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठ मधील हनुमान वार्ड बडा बाजार येथील हॉटेल बिसेनला अचानक मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच वेळीच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या दाखल होत आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला असून मालकाचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...