सोलापूर – छत्रपती संभाजीनगर येथे १२ ते १४ जून दरम्यान ३८व्या सबज्युनिअर हँडबॉल राज्य मुलांच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या राज्य स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचा संघ उतरवण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही निवड चाचणी सोमवार, ८ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता येथील अश्विनी हॉस्पिटल शेजारी असलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर होईल. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त हँडबॉल संघांनी आणि खेळाडूंनी या निवड चाचणी स्पर्धेत वेळेवर सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे सचिव सुदेश मालप व मुख्य प्रशिक्षक डॉ. आनंद चव्हाण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शरण वांगी (मो. ९१४६०३२४७३) यांच्याशी संपर्क साधावा.



















