जेऊर – मोहरमच्या निमित्ताने करमाळा शहरात इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ अन्नदान वाटप व करमाळा शहरातील विविध कब्रस्तानात वृक्षारोपण भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. करमाळा शहरातील विविध कब्रस्तानात 101 झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी करमाळा शहरातील मुस्लीम समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक हाजी युसुफ आतार व मार्गदर्शक तालुकाध्यक्ष हाजी कलीम काझी सर, जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक नासीर कबीर, मौलाना सय्यद अली, मुफ्ती अबु रेहान, मौलाना सिकंदर, मौलाना मुजाहीद, मौलाना वाजीद, मौलाना अन्वर, यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना कलीम काझी सर यांनी सांगितले की शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस झाडांचा -हास होत चालला आहे त्यामुळे त्याचा परिणाम पर्यावरणावर व मानवी जीवनावर परिणाम होत चालला आहे पाऊसाची कमी,उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे परिणामी हवामान बदल झाला आहे या गोष्टीचा विचार करून आम्ही वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे.
यावेळी मुफ्ती अबु रेहान यांनी सांगितले की वृक्षारोपण कार्यक्रम पुण्याचे काम असुन एक झाड लावण्याने त्यांच्यापासून मिळणारी सावली मानवाला आनंद देणारी आहे त्या झाडापासून मिळाणारी फळे चाखायला मिळतात त्यापासून मिळणारे उत्पन्न व ज्यांनी झाडे लावली आहेत त्यांना अनेक वर्षे व मेल्यानंतर नंतर ही पुण्य अखंड पणे मिळत राहतात प्रत्येक मानवाने आपल्या हयातीत एक तरी झाड लावावे असे आवाहन केले आहे.करमाळ्यातील श्रीराम प्रतिष्ठान येथे मोहरम व राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सकल मुस्लीम समाज चे मार्गदर्शक तालुकाध्यक्ष हाजी कलीम काझी सर आणि सावंत गटाचे नेते पैलवान गणेश सावंत यांच्या शुभहस्ते अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर सय्यद, सकल मुस्लीम समाज चे मार्गदर्शक समीर शेख, रोहित पवार फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण, नगरसेवक हुमरान मुलाणी, सकल मुस्लीम समाज चे उपाध्यक्ष जहांगीर बेग, नायब तहसीलदार हाजी सादिक काझी, नायब तहसीलदार युसुफ बागवान, जेष्ठ पत्रकार नरसाळे साहेब, रमजान बेग, इम्तियाज पठाण, किरण दुरगाळे, अलिम खान समशेर मदारी.फत्तु मदारी. अस्लम मदारी.उस्मान मदारी.रफीक मदारी.फिरोज मदारी.जमीर मदारी.रियाज मदारी.सलीम मदारी.जावेद मदारी.इत्यादी उपस्थित होते.
Post Views: 12