Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ३३ वर्षांच्या कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 3, 2024
in india
0
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ३३ वर्षांच्या कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर देशाचे माजी पंतप्रधान तथा प्रथितयश अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. ३ एप्रिल रोजी त्यांचा सभागृहातील कार्यकाळ संपला. मनमोहन सिंह १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर पोहोचले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले.

मनमोहन सिंग यांची कारकीर्द
निवृत्त राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि नोकरशहा, अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केले. भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. त्यांचे कुटुंब १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी भारतात स्थलांतरीत झाले.

डॉ. सिंग यांनी १९४८ मध्ये पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. १९५७ मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. डॉ. सिंग यांनी १९७१ मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच १९७२ मध्ये त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो.

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्र्यांची जबाबदारी सांभाळली होती. या काळातच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान देखील राहिले आहेत. मनमोहन सिंग सध्या ९१ वर्षांचे आहेत. त्याआधी १९९१-९६ या कालावधीत डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते.

राज्यसभेतून निवृत्त झालेले सदस्य
मनमोहन सिंग यांच्या सोबत इतर ५४ खासदारांचा देखील राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे. यामध्ये मंगळवारी ४९, तर बुधवारी पाच खासदार निवृत्त झाले आहेत. राज्यसभेतून सध्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राजीव चंद्रशेखर, पशुपालन आणि मत्स्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला, विदेश राज्यमंत्री वी मुरलीधरण, सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे सदस्य निवृत्त होतील. यामध्ये एल. मुरुगन आणि अश्विनी वैष्णव सोडून सर्व मंत्री लोकसभा लढणार आहेत.

सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. यापूर्वी त्या रायबरेली या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायच्या, पण यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरजेडीचे प्रकाश झा, समाजवादी पार्टीच्या जया बच्चन हे पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. काँग्रेसने नसीर हुसैन यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले आहे.

Post Views: 89
Previous Post

भंडारा – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ टिप्परवर कारवाई, मुद्देमाल जप्त

Next Post

छ. संभाजीनगरमध्ये दुकानात भीषण आग, धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
छ. संभाजीनगरमध्ये दुकानात भीषण आग, धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू

छ. संभाजीनगरमध्ये दुकानात भीषण आग, धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914856

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697