सोलापूर -मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील शेतात एका कोल्ह्याने हल्ला करून महिलेसह दोघांना जखमी केले. दरम्यान जखमी तरुणाने बचावासाठी कोल्ह्याला काठीने मार मारून जागेवर मारून टाकले.
जनाबाई धोंडीबा माळी ( वय 55 वर्ष) आणि योगेश राजकुमार कोठरे (वय 25 वर्ष, दोघे रा. मसले चौधरी) अशी जखमींची नावे आहेत.
योगेश हा सोमवारी रात्री शेतात असताना कोल्ह्याने त्यावर हल्ला केला. यात पायाला जखम झाल्याने त्यावर वडाळा येथील आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून येथे शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी सायंकाळी तो स्वतः दाखल झाला. तर जनाबाई माळी या आज मंगळवारी सकाळी शेतात असताना त्याच कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्याही जखमी झाल्या. त्यामुळे त्या उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात स्वतः दुपारी दाखल झाल्या. यादरम्यान आज कोल्ह्याने पुन्हा हल्ला केल्यावर योगेश या तरुणाने त्या कोल्ह्यास काठीने बचावासाठी मारहाण केली. यातच त्या कोल्ह्याचा जागेवर मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
Post Views: 11