सोलापूर : विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास आणि भोजन व्यवस्था असलेले वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात २०२६ – २७ या शैक्षणिक वर्षांसाठी गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू असून गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
येथील सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्यावतीने शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविले जाते. सात वर्षे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सेवेत असलेल्या या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेल्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले तसेच वसतिगृहाचेही नाव उज्वल केले आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठानच्या वतीने नव्याने प्रवेश देण्यात येणार आहेत. या वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे अर्ज लक्ष्मीदास सोनकवडे, अध्यक्ष, सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान १०८, मार्कंडेय नगर, कुमठा नाका, सोलापूर या पत्त्यावर करायचे आहेत. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने २०२६-२७ या वर्षासाठी पूर्ण वेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा व त्याची आर्थिक परिस्थिती खरोखर गरजू असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यानी दि. ७ ऑगस्ट २०२६ या अंतिम मुदतीत अर्ज करावयाचे असून अधिक माहितीसाठी लक्ष्मीदास सोनकवडे ९०८२०२३३२९, चन्नवीर भद्रेश्वर मठ ९९२२२४११३१ दत्ता थोरे ९९२२९३०२०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 39