अकलूज – श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि.८ ऑगस्ट रोजी महिलांसाठी मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती अकलूजचे नगरसेवक युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी दिली.
सयाजीराजे मित्र मंडळ, शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना आणि नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी यांच्यावतीने सदरचे शिबिर जिजामाता कन्या प्रशाला अकलूज एसएनडीटी कॉलेज या ठिकाणी दि८ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेमध्ये आयोजित केले आहे. महिलांची तपासणी तज्ञ महिला डॉक्टर करणार असून पुढील उपचार नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहेत .
या शिबिरात महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तसेच महिलांच्या छातीचा कॅन्सर व मोफत हिमोग्लोबिन तपासणी होणार आहे. या तपासण्यामुळे महिलांचे सुमारे दीड ते तीन हजारापर्यंत चा खर्च वाचणार आहे. महिलांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे कार्य. संचालक सुहास यादव, डॉ. अभिजीत राजेभोसले, डॉ. अरुंधती खराडे पाटील उपस्थित होत्या. याकरता महिलांनी प्रा. गौरव देशपांडे 8208890743, प्रा. रविकांत देशमुख 9763636663, यशराज सूर्यवंशी 78 75 67 3309 , अभिषेक शिंदे 9503172509 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
चौकट..
ग्रामीण भागातील महिलांना या आजाराची मोठी भीती वाटते. परंतु कर्करोगाचे प्राथमिक स्तरावरच निदान झाले तर तात्काळ त्याच्यावर उपचार होऊन रुग्ण बरे होतात. यामुळे महिलांनी न घाबरता आपल्या तपासण्या करून घ्याव्यात. असे आवाहनही सयाजीराजे मोहिते पाटील यांनी केले.