उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
एकूण 1073 रुग्णांची मोफत तपासणीत
देगलुर/प्रतिनीधी
शहरातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते दिगंबर कौरवार आणि मित्र परिवार यांच्या वतीने सलग पाच वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे प्रभावी आणि कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेन्द्रजी फडणवीस साहेब आणि माजी खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भाजपा मा. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा गोजेगावकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ श्री नरेश देवणीकर, मा नगराध्यक्ष नंदु आण्णा दाशेटवार शिवाजी मामा कनकंटे,उपसभापती रवींद्र पाटील,रमेश पाटील हाळीकर ,शिवकुमार देवाडे, मारोती पुलुचवाड, प्रशांत पाटील आचेगावकर अशोक गंदपवार ,
भावना दाशेटवार सतिश जोशी , डॉ मलशेटवार, डॉ तम्मेवार, डॉ सुरनर, डॉ पियूष तम्मेवार, डॉ चिलवरवार, डॉ तहाडे, डॉ थडके, डॉ लाडके हे उपस्थित होते.याप्रसंगी एकूण 1073 रुग्णांची तपासणी करण्यात आली यात डोळ्याचे 75 रुग्ण तपासण्यात आले, सर्जरी 242 रुग्ण तपासण्यात आले, दाताचे 72 रुग्ण, त्वचारोग तपासणी 58, हृदय रोग , दमा, शुगर यांचे 352 रुग्ण तपासण्यात आले, ई. सी. जी.25, 17 सिटीस्कन,आणि 25 लोकांनी रक्तदान केले.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिगंबर कौरवार यांनी व संतोष आगलावे, विकास मोरे, योगेश मैलागिरे, किरण उल्लेवार, राहुल पेंडकर, अमित पेंडकर, मनोहर देगावकर,गंगाधर दाउलवार ,धनाजी जोशी ,शंकर बाबरे ,अन्सारी आजीम, सचिन कांबळे ,अशोक कांबळे भास्कर कांबळे, सौरभ मधुरवार, नितीन धूप्पेवार, आदींनी परिश्रम घेतले आणि आरोग्य शिबीर यशस्वी करण्यात आले.


![न्यू कनिष्ठ [स्वतंत्र ] कला महाविद्यालय करजखेडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2026/09/17-saptbar-01.jpg?resize=120%2C86&ssl=1)




















