बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. हे शिबीर” शिल्पा मल्टीस्पेशलिटी डेंटल क्लिनिक, प्रियदर्शनी रेडीमेडच्या शेजारी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ठिकाणी आयोजित करण्यात येते.
डॉ.तेजस लाड व डॉ.किरण लाड यांनी २० पेशंटची तपासणी केली. या शिबिराची वेळ ११ ते1 १ असते. मोफत डेंटल तपासणी, दातांबाबत तज्ञांचा सल्ला, तोंडाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन व दातांच्या स्वच्छतेविषयी माहिती दिली जाते . या शिबिराचे प्रोजेक्ट चेअरमन डॉ. किरण लाड होत्या. हे शिबीर डॉ. किरण लाड व डॉ. तेजस लाड यांच्या सहकार्याने संपन्न झाले. त्यावेळी ला. कावेरी बागुल, ला. दयानंद रेवडकर उपस्थित होते.