सांगोला – विद्यामंदिर प्रशाला येथील पर्यवेक्षक उत्तम सरगर यांची कोळा विद्यामंदिर हायस्कुल व ज्यु.कॉलेजच्या प्राचार्यपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते उत्तम सरगर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके विश्वेश झपके, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदिप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासाहेब नरुटे, शुभांगी घोंगडे, मुख्य लिपिक हेमंत नलवडे यांनी नूतन प्राचार्यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व वैचारिक जडणघडणीचा जो पाया रचला, तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझी पुढील वाटचाल राहील असे प्राचार्य उत्तम सरगर यांनी स्पष्ट केले.