जेऊर – करमाळा तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यासाठी करमाळा तालुका ग्राहक मंच मैदानात उतरला आहे.प्रशासनाने बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना ग्राहक मंचाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागामध्ये डॉक्टरांची संपूर्ण माहिती असलेले के वाय डी कार्ड तयार करून ठळकपणे लावण्याचे निर्देश देण्यात यावेत.
प्रत्येक दवाखान्याच्या दर्शनी भागात के वाय डी स्कॅनर लावण्यात यावेत.तो स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांचे नाव,शैक्षणिक पात्रता, हॉस्पिटल नोंदणी प्रमाणपत्र या सर्वांची माहिती लोकांच्या मोबाईलवर स्पष्टपणे दिसेल.तसेच
तालुक्यात अनेक डॉक्टरांचे नूतनीकरण करण्याची तारीख उलटून गेलेली आहे तरी देखील त्यांनी नूतनीकरण केलेले नाही त्याची माहिती या क्यू आर कोड मुळे समजेल.यामुळे वैद्यकीय क्षेत्रात विश्वासहार्यता निर्माण होईल.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,ज्या डॉक्टरांनी के वाय डी कार्ड तयार केलेले आहे त्याची प्रत त्यांनी उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडे जमा करावी व उपजिल्हा रुग्णालयाकडून झेरॉक्स प्रत अ.भा.ग्राहक पंचायतीला देण्यात यावी.त्यामुळे समजेल की कोणते हॉस्पिटल अधिकृत आहे व कोणते हॉस्पिटल अनाधिकृत आहे यामुळे बोगस डॉक्टरांनाही आळा बसेल. हे निवेदन देताना करमाळा तालुका अखिल भारतीय ग्राहक मंचाचे अजीम खान तालुका सचिव
ब्रह्मदेव माने तालुका अध्यक्ष,चक्रधर पाटील. तालुका उपाध्यक्ष माधुरी परदेशी जिल्हा महिला आघाडी प्रमुख भीमराव कांबळे तालुका कार्यकारणी सदस्य भीष्माचार्य चांदणे.जिल्हा प्रबोधन प्रमुख मिनाक्षी जाधव इत्यादी उपस्थित होते.
Post Views: 10