पंढरपूर – शहरातील भादुले चौकातील दुकानांना बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत चप्पल दुकाने, सायकल दुकाने, किराणा दुकाने, पानटपऱ्या तसेच इतर अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या आगीचे नेमके कारण पोलिसांनी शोधून काढावे तसेच या जळीतग्रस्त खोकेधारकांना शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी येथील युवा नेते तथा अँड.प्रणव परिचारक यांनी केली. या संदर्भात त्यांनी येथील शहर पोलिस ठाण्यात जावुन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेतली.
येथील भादुले चौकातील सहा ते सात दुकानांना अचानक बुधवारी मध्यरात्री आग लागली. या आगी मध्ये या छोट्या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या दुकानांची ॲड प्रणव परिचारक, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गटनेते भागवत बडवे, अमोल डोके ॲड सुनील वाळूजकर, राजू सर्वगोड, धर्मराज घोडके भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पानकर, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम बोहरी, मालोजी शेंबडे यांनी भेट घेऊन पाहणी केली
यावेळी सदर व्यापाऱ्यांनी आषाढी यात्रा जवळ आल्याने नुकताच दुकानात माल भरला होता आमच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. जळालेली दुकाने, राख झालेला संसार आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
दरम्यान या घटनेची सखोल चौकशी व्हावी, आगीचे नेमके कारण समोर यावे आणि जबाबदार घटकांवर योग्य कारवाई व्हावी म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांची भेट देऊन या दुर्घटनेचा तातडीने पंचनामा पूर्ण करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी व न्याय मिळवून द्यावा म्हणून ॲड प्रणव परिचारक यांनी मागणी केली आहे.
Post Views: 10