बार्शी – वखारिया विद्यालय उपळे दुमाला येथे १०० झाडांचे रोपण करण्याच्या संकल्प अंतर्गत जिव्हाळा प्रतिष्ठान स्वामिनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व ग्राहक मंच महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने २५ रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बार्शी तालुक्याचे तहसीलदार एफ.आर. शेख, भारतीय आझाद कामगार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्राचार्य चंद्रहंस गंभीर, महाराष्ट्र शाखेचे महासचिव बी. आर. देशमुख, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी निलेश देठे होते. बार्शी वकील संघाचे माजी अध्यक्ष राहुल झालटे, ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष तानाजी गुंड, पोलीस निरीक्षक अमोल कदबाने, सरकारी कामगार अधिकारी यास्मीन शेख, ग्राहक संरक्षण मंचाचे पदाधिकारी मुस्ताक मिस्त्री, बाळासाहेब शिंदे, संतोष कोल्हाळ यांच्यासह रामेश्वर बुरगुटे, महेश बुरगुटे, तात्यासाहेब रोडे, राजेश पुजारी, अश्विनकुमार अहिरे, सामाजिक कार्यकर्ते सतीशकुमार बुरगुटे, साहित्यिक इंद्रजित पाटील, मुख्याध्यापक वखारिया विद्यालय दयानंद रेवडकर, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचा स्वागत समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रशालेच्यावतीने सर्व मान्यवरांचा शाल व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वखारिया विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख रमेश लंकेश्वर, सहाय्यक प्रशांत काशीद क्रीडा विभागाचे प्रमुख नामदेव महाले यांनी विशेष योगदान दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व विकास बुरगुटे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 4