बार्शी – येथील दत्त प्राथमिक विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी या दोन्ही शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी छ. क्री. शि.व स.संस्था, उपळाई (ठों) या संस्थेचे अध्यक्ष मोहनआण्णा ठोंगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक दत्तात्रय रामचंद्र मोरे, सौ.तेजस्वी ठोंगे (सचिवा), मृन्मय ठोंगे, प्रमोद साळुंखे, प्रमुख उपस्थिती म्हणून सोपल प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन काळे, दत्त प्राथ.चे मुख्याध्यापक श्रीकांत कुंभारे, माजी विद्यार्थी दिग्विजय नलावडे, आदर्श जगताप,अशोक मोरे,प्रकाश वाघमोडे,अविनाश साळुंखे उपस्थित होते
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थाध्यक्ष मोहन ठोंगे व अरुणा मठपती यांच्यातर्फे सन २५-२६ मध्ये १० वी बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या प्रथम तीन विध्यार्थ्यांना तसेच ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थ्यास रोख रकमेच्या स्वरुपात दिलेल्या बक्षिसांचे तसेच १० वी विज्ञान विषयात प्रशालेत प्रथम आल्याबद्दल शितल पाटील मॅडम यांनी बक्षिस म्हणून दिलेले मनगटी घड्याळ व इतर उपक्रमातील(मेहंदी,रांगोळी,चित्रकला) प्राविण्य प्राप्त बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मोरे आबा व अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन व सुंदर फलक लेखन युवराज जगताप यांनी तर आभार मंगेश मोरे यांनी मानले.
Post Views: 5