सोलापूर – गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सोमनाथ बजरंग जाधव (वय-२४ वर्षे, रा. सेटलमेंट फ्रि. कॉलनी नं. ३, डोणगाव रोड, सोलापूर ) यास सोलापूर व उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे .
सोमनाथ जाधव या विरुध्द सन २०२२, २०२३, २०२४ व २०२५ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, सरकारी नोकराचे कामात अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी करणे, सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सलगर वस्ती पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर यांनी दि.१० जून २०२६ रोजी सोमनाथ जाधव यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
Post Views: 4