मोडनिंब – (ता.माढा) येथील श्री मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी श्री मारुती मंदिरात विशेष पूजन, अभिषेक व हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्यात आले. मंदिर परिसर फुलांच्या माळांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आला होता.
दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.भक्तांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो गावकऱ्यांनी सहभाग घेतला. संध्याकाळी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले. स्थानिक भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले.यावेळी गावातील सर्व भाविकांनी सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व युवा वर्गाची सक्रिय सहभागाने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व आनंदमय वातावरणात पार पडला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान मंदिर ट्रस्ट मोडनिंब,जय हनुमान भक्त परिवार आणि ग्रामस्थ, पुजारी गुरव यांनी परिश्रम घेतले.

















