सोलापूर- शांत जळणाऱ्या दिव्याचा प्रकाश देखील लांबपर्यंत पोहचतो. जीवनात शांतता लाभल्यास मानवाची उत्क्रांती होते. रागाने द्वेषाने वैयक्तिक आणि सामाजिक अधोगतीच होते. प्रत्येक धर्मात शांततेलाच प्राधान्य देण्यात आले असून. शांततेतून सामंजस्य पणा येतो आणि याच सामंजस्याने समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविता येतात, असे मत महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल चे माजी चेअरमन ॲड. मिलिंद थोबडे यांनी जागतिक शांतता दिनानिमित्त जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने निर्मलकुमार फडकुले सभागृह जे.पी. शांतता पुरस्काराचे वितरण समारंभात व्यक्त केले.
यंदाचा शांतता पुरस्कार माजी आमदार प्रकाश यलगुलवार, पुण्याचे जेष्ठ समाजसेवक जाहिदभाई शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, द. सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडयाचे सरपंच विजय राठोड तर संघटनात्मक पातळीवर आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांना प्रदान करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. जैनोद्दिन मुल्ला यांनी या पुरस्कारा मागील उद्देश व संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. जैनुद्दीन पटेल, प्रा. इरफान लालकोट, अल्लाबक्ष सय्यद खान, म. शफीक रचभरे, सलीम शिकलगार, प्रा. इनुस शेख, प्रा. महेबूब पटेल, जावेद मुजावर, सिकंदर सरोडगी, नवाज नाईकवाडी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अकबर खान पठाण तर आभार ॲड. आसिफ शेख यांनी केले.
या कार्यक्रमास राम गायकवाड, हाजी मतीन बागवान, रामचंद्र निकम, सुनील चलवदी, बाबा शेख, माजी प्राचार्य म. हनीफ शेख, प्राचार्य इ. जा. तांबोळी, मन्नी मुजावर, शफी शेख, रिझवान शेख व शांतता प्रेमी नागरिक उपस्थित होते.
चौकट – समाजात शांतता प्रस्थापित व अंध, अपंग, दिन दुबळयांना आयुष्यात उभ करणाऱ्या प्रती मी आजचा पुरस्कार अर्पण करतो. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शांततेचा पुरस्कार करावा ते त्यांच नैतिकता आहे असे मत माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी व्यक्त केल.
चौकट- आपल्या चेहऱ्यावरील हास्यांनी देखील प्रेम आपुलकी व्यक्त होत. प्रेमळपणानी अशांतता देखील मावळते. शांततेतून ध्येय साध्य केलेल चिरकाल टिकत आणि ते शाश्वत असत. द्वेषान प्रेरित झालेल्याच शेवट देखील विनाशकारी असत. जर्मनीतील हिटलरच उदाहरण देऊन शांततेच महत्व अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.