सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पद्यशाली शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली.
आज संस्थेकडून संस्थेच्या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत श्री गणेश महापूजेचे आयोजन केलेले होते. यावेळी मा. ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते ‘श्री’ ची पूजा करण्यात आली. तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सचिव श्री. दशरथ गोप यांनी मा. ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड्. श्रीनिवास क्यातम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविक करताना संस्थेविषयी माहिती दिली. अनेक वर्षापासून दादांचे संस्थेशी ऋणानुबंध आहे. तसेच संस्थेच्या अनेक समस्या आहेत. अनेक कामे प्रलंबित आहेत. संस्था चालविणे अलिकडच्या काळात जिकरीचे झाले आहे. महिला महाविद्यालयात अनेक कामगारांचे मुली शिकतात. जेवढे करता येईल तेवढे संस्था करीत आहे. आमच्या काही शैक्षणिक मागण्या आहेत. त्या मागण्यांचे निवेदन सचिव दशरथ गोप यांनी मा.ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना दिले. सदर सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले,
प्रमुख पाहुणे मा. ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांशी संवाद साधले. तसेच सध्या कुठे अतिवृष्टी, कुठे कमी वृष्टी त्यामुळे फार मोठे पिकांचे नुकसान होत आहे. शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीबाबत आपण सर्वजण जागृक पाहिजे. संस्थेने निवेदन दिले, ते मी स्विकारतो व त्या प्रश्नांकडे लक्ष देईन, असे म्हणाले,
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त सर्वश्री. दिनेश यन्नम, पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिटयाल, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, प्रभाकर आरकाल, श्रीनिवास जोग, श्रीनिवास गड्डम, रामदास इप्पाकायल, आई प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन डांगरे, सोलापूर शहर भाजपा अध्यक्ष रोहिणी तडवळकर, सुधा अरमाळी तसेच माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे, माजी मुख्याध्यापक मधुकर गवळी, संस्था संचालित सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम यांनी मानले. सूत्रसंचालन सहशिक्षक अभिन भानप यांनी केले.
Post Views: 18