पंढरपूर – शहरातील गजबजलेल्या जुनी पेठ पोलीस चौकी समोरील घराला अचानकआग लागली. या आगीत घर मालक बाबर यांच्या घरातील किरकोळ साहित्य जळून खाक झाले आहे.मात्र सुदैवाने या मध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.आग भडकल्याचे लक्षात येताच माजी नगरसेवक व भाजप माजी शहरामध्यक्ष विक्रम शिरसट तसेच परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या मदतीने आग विझवली व मोठी घटना टळली.
जुनी पेठ मधील श्री.बाबर यांच्या पडक्या घराला मंगळवारी अचानक आग लागली. या आगीमुळे घरात पडलेल्या कचऱ्यानेपेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. शेजारील घराना आगीचा फटका बसतोकी काय, अशी भितीनिर्माण झाली होती. मात्र, माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. यावेळी येथील नागरिकांनी अज्ञाताने कचरा पेटवल्याचा आरोप केला आहे.या घराच्या वरुन विद्युत वाहिनीच्या केबल डिश टिव्हीच्याकेबल गेल्या आहेत. यास आग लागली असती तर परिस्थीती अधिकच बिकट झाली असती. मात्र माजी नगरसेवक विक्रम शिरसट व परिसरातील नागरिकांनी या घटनेची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या मदतीने वेळीच आग विझवली. त्यामुळे मोठीदुर्घटना टळली आहे.
Post Views: 7