
जेऊर – कुंभेज (ता.करमाळा) या गावासाठी स्मशानभूमीसाठी जागा मिळत नाही ही अडचण लक्षात घेता कुंभेज ग्रामस्थांनी करमाळा तहसील समोर अमरण उपोषण सुरू केले आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून या गावाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत ही गंभीर बाब लक्षात घेऊन कुंभेज गावचे युवक सुहास साळुंखे यांनी करमाळा तहसील कार्यालयास निवेदन देत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गावालगत असलेल्या वन विभागाच्या गट नंबर 23 मधील 21 गुंठे जागेची स्मशानभूमीसाठी उपलब्धता करून द्यावी प्रशासनाने वनविभाग व महसूल विभाग यांच्याशी चर्चा करून कुंभेज ग्रामस्थांचा हा ज्वलंत प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा. कुंभेज ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा तहसील समोर अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या व या उपोषणास आपला पाठिंबा दर्शविला यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, रिपब्लिकन सेनेचे देवा लोंढे इत्यादी उपस्थित होते सर्व ग्रामस्थांच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.व स्मशानभूमीच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
Post Views: 36