
सोलापूर – शासनाने एकल महिला दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. त्यानुसार वर्ल्ड ऑफ विडोज ( WOW ) या संस्थेच्यावतीने महापालिका हिरवळीवर एकल महिलांच्यावतीने साजरा करण्यात आला. अध्यक्षा विद्या लोलगे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अशा अनेक एकल महिलांचा हळदीकुंकू लावून सन्मान करण्यात आला.
यावेळी आबेदा नीलमेघम यांचाही खास सत्कार केला. त्यांनी आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण देऊन चांगल्या पदावर कार्यरत आहेत. मुलगा अमेरिकेत असल्याचे सांगितले.
यावेळी सायरा शेख, लता ढेरे,मार्था आसादे, शोभा गायकवाड, शबाना मुलाणी, मोनिका सरकार, शशिकला कसपटे, शारदा मसूती, पुष्पा हलकूड, स्वाती मुकणार, लक्षमी माने, कांचन चौगुले, मदिना पटेल आदी महिला उपस्थित होते.



















