मोहोळ – फडणवीस हे शिवसेना फोडणारे असतील तर उद्धव ठाकरे शिवसैनिक पेरणारे आहेत. त्यामुळे आल्या गेल्याचा विचार करत बसू नका. आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा.शिवसेनेच्या रामरक्षा कार्यक्रमाची तयारी करा असा सल्ला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला .
शिवसेनेच्या वतीने मोहोळ येथील शुभंम हॉल येथे विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या .
यावेळी उपस्थित शिवसैनिकाची मते जाणून घेण्यात आली .
उपजिल्हाप्रमुखासह तालुका स्तरावरील रिक्त पदाच्या नियुक्त्या करण्याबाबत इच्छुकांची नावे घेण्यात आली असून लवकरच या निवडी जाहिर करण्यात येतील असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
उपजिल्हाप्रमुखासह तालुकाप्रमुख,उप तालुकाप्रमुख सह विधानसभा प्रमुखांच्या इच्छुकांशी नावे आजमावून घेत लवकरच याबाबत निवड केल्याजाणार असल्याचे सांगितले .
यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण काकडे, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे ,उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, मोहोळ विधानसभा संपर्कप्रमुख हुजूर इनामदार तालुकाप्रमुख अशोक भोसले, युवा सेनाप्रमुख महेश देशमुख, मनोज नागणे
माजी नगरसेविका सीमा पाटील, नगरसेविका वृशाली जाधव,माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, सौरभ देशमुख,तुकाराम माने,बाळासाहेब वाघमोडे दिलीप टेकाळे दिलीप मोटे, दिपक शिरसट,
संतोष चव्हाण अर्जुन लोखंडे सुभाष सरपळे विनोद आंब्रे विनोद भोसले दीपक शिरसाट दऱ्याबा डोके आदि उपस्थित होते.
चौकट…. निवडणूकीच्या वेळी स्थानिक नेते विरोधकांना मॅनेज होतात त्यामुळे ग्रामीण भागातील प्रामाणिक शिवसैनिकांची अडचण होते काम करता येत नाही
विनोद भोसले शिवसैनिक