पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल अठरा गणेशोत्सव मंडळानी गणेशाची प्रतिष्ठापना केली होती .24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर अश्या दोन दिवशी डोळ्याचे पारणे फेडणारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत गणेशभकतांना मेजवानी देत अतिशय शांततेत व भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला .पहील्या दिवशी म्हणजे 24 सप्टेंबर रोजी सात मंडळांनी गणेश विसर्जन केले. यामध्ये लंबोधर, गजवक्र, नरसिंह गणेश मिञ मंडळ, गजराज गणेश मिञ मंडळ, श्रीदत गणेश मिञ मंडळ, संग्राम गणेश मिञ मंडळ, अष्टविनायक गणेश मिञ मंडळ या मंडळांनी पहील्या दिवशी ढोल ताश्यांच्या गजरात, झाज पथक, लहान मुलांचे नृत्य , जेजुरी येथील खंडोबा देवस्थानचे नृत्य, सेलिब्रेटी पथकाचे बहारदार नृत्य यांसह अनेक पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर पहील्या दिवशी सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संग्राम गणेश मिञ मंडळाने नटरंग व कातर हा जिवंत देखावा व मराठी, हिंदी गाणयावरील बहारदार कार्यक्रम सादर करीत गणेश भक्तांना मेजवानी दिली .पिलीव येथील गणेश मंडळानी यंदाच्या मिरवणूकीत अनेक बहारदार कार्यक्रम आयोजित करीत गणरायाला मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात निरोप दिला .सर्व मिरवणुका अतिशय शांततेत पार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नवले, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, हवालदार महेश थोरात, हवालदार शंकर मरळे, गोपाळ घोळवे, नितीन लोखंडे, मन्सूर7 नदाफ तसेच होमगार्ड स्टाफ, तसेच एस आरपीचया 32 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पहील्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुका अतिशय शांततेत पार पडलया. फोटो _ पिलीव येथील संग्राम गणेश मिञ मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झालेली अलोट गर्दी
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















