सोलापूर : पावसाळ्यात शहरात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सोलापूर महापालिकेने २४ तास कार्यरत आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला असून, बुधवारी रात्रीपर्यंत विविध प्रकारच्या १२ तक्रारींची नोंद झाली. आपत्कालीन पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत सर्व तक्रारींचे निवारण केल्या आहेत.
पावसामुळे शहरातील बलिदान चौक आणि सिव्हिल हॉस्पिटलसमोरील पीएचई स्टोअर परिसरात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच एकता नगर, शेटे वस्ती आणि भैय्या चौक परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यंत्रणा तातडीने सक्रिय करण्यात आली आणि झाडे हटविणे तसेच पाणी उपसण्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली.
पावसाळ्यात इमारत पडणे, झाडे कोसळणे, सखल भागात पाणी साचणे, ड्रेनेज तुंबणे तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत मिळणार आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले असून ही यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक असे –
नगर अभियंता विभाग (इमारत पडणे, झाड पडणे, पाणी साचणे)
दूरध्वनी : ०२१७-२७४०३३५ / ०२१७-२७३५२९३
टोल फ्री : १८००२३३१९१४, १८००२३३१९१६
मोबाईल : ९४२३९९१६५३, ९४२३९९३९०६
सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग (ड्रेनेज तक्रारी)
८४२१०४०७५५
झोन १ व २ : ८६६९१७८४६२
झोन ४ व ५ : ८२३७३८२८७३
झोन ३ व ८ : ९५७९८५४५६८
झोन ६ व ७ : ८३८१०९०७७७
पाणीपुरवठा तक्रारी
टोल फ्री :
९६०७९८०३९९
७७०९०८९३७१
हे क्रमांक नागरिकांनी पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत तक्रार नोंदविण्यासाठी वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
—–
Post Views: 7