
हा पालखी सोहळा महाळुंग, श्रीपूर, बोरगांव व माळखांबी या मार्गावरून पुढे पंढरपूर कडे मार्गस्थ होत असून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे व डांबरी रस्त्यालगतच्या साईड पटट्याचे समतली करण जेसीबी च्या सहाय्याने करणेत आले आहे . तसेच पालखी तळावर हायमास्ट दिवे अंतर्गत रस्ते , खच्छता करणेचे काम जोरात सुरु आहे .
*पालखी तळाची जागा वाढवून देणेची मागणी*
याप्रसंगी उपस्थित असलेते राजकुमार पाटीत व प्रतापराव पाटील यांनी सध्याचा पालखी तळ १० एकराचा आहे . परंतू यात पालखी साठी मोठा सभामंडप असतो व तसेच सुविधांमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिंड्या व वारकरी मुक्कामासाठी हे ठीकाण पसंत करत आहेत शेती महामंडळाची अजून जागा शिल्लक असल्याने तळा लगत असलेला १० एकर जागेतीत काटेरी झाडे झुपडे तोडून जागा स्वच्छ करून मिळावी जेणें करून वारकऱ्यांना येथे निवास चांगला येईल अशी विनंती केली . यास जिल्हाधिकरी यांनी अनुकुलता दर्शवली .





















