जेऊर – प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी करमाळ्यात गणेश विसर्जनावर शहरातील मशिदी वरून पुष्पवृष्टी करण्यात आली
करमाळा शहरातील वेताळ पेठ मधील जामा मशीद येथून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जामा मशीद ट्रस्ट, सकल मुस्लिम समाज, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील देवीचा माळ येथील मानाचा पहिला गणपती यांच्या विसर्जनावर पुष्पवृष्टी तसेच फुलांचे हार गणरायावर घालण्यात आले
सदरचा उपक्रम हा गेली अनेक वर्षापासून मुस्लिम समाज बांधव राबवित असून यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यतेची प्रचिती दिसून आली यावेळी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने गणेश विसर्जनातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा फेटा शाल श्रीफळ हार देऊन सन्मानाने सत्कार करण्यात आला सदरचा उपक्रम हा करमाळा शहरातील सकल मुस्लिम समाज गेली 35 ते 40 वर्षापासून अविरतपणे राबवित असून यावर्षीही सदरचा सामाजिक ऐकतेचा व हिंदू मुस्लिम सुलोख्याचा आगळा वेगळा उपक्रम करमाळा मुस्लिम समाज बांधवांनी राबविला असून हा उपक्रम संपूर्ण करमाळा तालुका नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे
चौकट घेणे
पत्रकार स्वर्गीय सय्यद भाई यांचा हा आगळावेगळा उपक्रम,,,,,,,
करमाळा शहरातील मुस्लिम मोहल्ला विभागातील सय्यद भाई पत्रकार यांनी हा सदरचा उपक्रम गेली 35 ते 40 वर्षापासून चालू केला असून तोच सामाजिक उपक्रम त्यांचे चिरंजीव तसेच सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर भाई सय्यद यांनी चालू ठेवला आहे सदरचा उपक्रम हा करमाळा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हिंदू मुस्लिम भाई चारा कायम अबाधित राहावा हा मूळचा संकल्प असल्याचे श्री सय्यद यांनी बोलताना सांगितले सदरच्या उपक्रमाचा मात्र करमाळा तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे
यावेळी सदरच्या कार्यक्रमाला सकल मुस्लिम समाज अध्यक्ष ज़मीर भाई सय्यद ,जामा मस्जिद चे सचिव हाजी उस्मान सय्यद, नगरसेवक हुमराण मुलाणी, पत्रकार नाशिर कबीर, युसुफ बागवान,डॉ ए पी जे अब्दुल कलाम सचिव पिंन्टु बेग,रोप फाउंडेशन चे अध्यक्ष मुस्तकीम पठाण, तसेच जामा मस्जिद ट्रस्ट व डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे अरबाज बेग शाहिद बेग,अफरोज पठाण ,जाहगीर बेग, आयुब मदारी ,इरफान मदारी ,मजहर नालबंद, इस्माइल सय्यद,रिहान सय्यद ,नुर दारुवाला ,अल्ताफ दारुवाला ,आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते