पंढरपूर – राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. बी.पी.रोंगे यांचे विचार प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहचावे या उदात्त हेतूने त्यांच्या कार्यकर्त्यांसह डॉ.रोंगे सरांचे अख्खे कुटुंब कामाला लागले आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघात एका जागेसाठी ३० जण उमेदवार रिंगणात असले तरी ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना माननारा मोठा शिक्षकवर्ग आहे. डॉ. रोंगे सरांचे पारदर्शी कार्यावर लक्ष आहे. आमदार होण्यापूर्वीच डॉ. रोंगे सरांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविले या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील शिक्षण संस्थांमधुन तसेच शिक्षक वर्गांमधून देखील त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी माढा तालुक्यातील जवळपास २५ शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन डॉ. रोंगे सरांची असलेली भूमिका स्पष्ट केली. डॉ. रोंगे सरांच्या वतीने त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रेमलता रोंगे यांनी गेल्या आठवड्यात भेटी गाठीवर लक्ष केंद्रित केले असून सर्वत्र प्रचंड प्रतिसाद असल्याचे जाणवते आहे. सौ. रोंगे यांनी काल कुर्डुवाडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, महात्मा ज्योतीबा फुले उच्च माध्यमिक व कला प्रशाला कुर्डुवाडी, लीड स्कूल कुर्डूवाडी, प्रगती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज कुर्डू, शरद विद्यालय बारलोणी, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे, श्रीमान लक्ष्मणराव पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रोपळे, संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी, छत्रपती शिवाजी विद्यालय वडशिंगे, न्यू इंग्लिश स्कूल वडशिंगे, मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव, न्यू इंग्लिश स्कूल रिधोरे यासह इतर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.
दरम्यान विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य करणाऱ्या ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांनी आपल्या अभ्यासाने आणि नियोजनात्मक धोरणामुळे प्रत्येक घटकाला यश मिळत आहे. या निवडणुकीच्या कारणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन खटके, भारत माने यांच्यासह डॉ.रोंगे सरांवर मनापासून प्रेम करणारे अनेक शिक्षकवृंद उपस्थित होते.
Post Views: 14