सोलापूर – समर्थ सहकारी बँकेचे संचालक मंडळ निवडण्यासाठी रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीतील सहकार परिवार पॅनलच्या प्रचारासाठी शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी दत्त चौक ते मेकॅनिक चौक या मार्गावर प्रचार फेरी काढण्यात आली होती. पॅनल प्रमुख राम तडवळकर, राकेश टोळ्ये, केतन व्होरा यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली.
दत्त चौकातून निघालेली ही रॅली राजवाडे चौक नवी पेठ मार्गे मेकॅनिक चौक येथे पोहोचली. यावेळी प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेले उमेदवार कार्यकर्ते यांनी नव्या पेठेतील सभासद, खातेदार, हितचिंतक यांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांना उमेदवारांबाबत माहिती दिली आणि सहकार परिवार पॅनलच्या बारा उमेदवारांचे कपबशी चिन्ह आहे त्यावर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सभासदांनी, खातेदारांनी समर्थ सहकारी बँक वाचली पाहिजे. त्यासाठी आम्ही आवश्यक ते सहकार्य आपणास करू असे आश्वासन सर्व उमेदवारांना दिले.
यावेळी बोलताना राकेश टोळ्ये यांनी समर्थ सहकारी बँक पुन्हा नावारुपाला आणण्यासाठी सहकार परिवर पॅनल कटिबद्ध असून या पॅनलच्या उमेदवाराच्या चिन्ह कप बशी या चिन्हावर मतदान करून भरघोस मताने विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी उमेदवार किरण करकमकर, डॉ .प्रशांत बागेवाडीकर, दिलीप दुलंगे, अमित कामतकर, युवराज माने, सुजाता इनामदार यांच्यासह समर्थ बॅंकेवर बिनविरोध निवडून आलेले प्रकाश बंडगर तसेच निशिकांत खेडकर, अरुण गोगी, दिलीप पेठे, नितीन कवठेकर, दत्ता कुलकर्णी, बजरंग कुलकर्णी, दूधगीकर, शिवानंद परगे, रुद्रेश बोरामणी, शशी थोरात, प्रभाकर पडळकर,विठ्ठल बडगंची, अजय कुलकर्णी, संपदा जोशी, सिंधू कोणापुरे, अमृता गोसावी यांच्यासह असंख्य सभासद, खातेदार, हितचिंतक सहभागी झाले होते.























