सोलापूर : प्रभाग क्रमांक ६ मधील टेळे नगर परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा समस्येच्या निराकरणासाठी चार इंची नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केल्याबद्दल नगरसेवक गणेश वानकर यांचे नागरिकांनी आभार मानत समाधान व्यक्त केले
टिळे नगर परिसरात अनेक वर्षांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महापालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवक गणेश वानकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी “निवडणुका होताच तुमचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवू,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याच आश्वासनाची पूर्तता करत आता चार इंची नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
या विकासकामाचा शुभारंभ नगरसेवक गणेश वानकर, नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेविका मृण्मयी गवळी, महादेव गवळी, अर्जुन गायकवाड, अरुण जाधव, दिलीप वाघमारे, आण्णा खंडागळे, ज्योती माने, अक्षय धायगुडे तसेच टेळे नगरमधील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी महेश शेलार, अनंत दांडगे, अल्ताफ तांबोळी, सचिन अपराध, अमित अवताडे, अक्षय खंडागळे, सुभाष काळे, सविता होळकर, मंगल वाघमारे यांच्यासह टिळे नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिकांच्या मते, या पाइपलाइनमुळे टेळे नगरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या विकासकामाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
Post Views: 12