बार्शी – बार्शी शहरातील योगेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त ‘हनुमानाचे उड्डाण, संजीवनीसाठी प्रयाण’ या रामायणातील प्रसंगावर आधारित हलत्या देखाव्याचे उद्घाटन आमदार दिलीप सोपल व कुस्ती सम्राट अस्लम काझी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दगडू मांगडे, गणेश जाधव, योगेश सोपल, माजी सभापती युवराज काटे, मंडळाचे आधारस्तंभ सुधीर सोपल, ॲड. बी.एन. चव्हाण, आबाजी पवार, बाळासाहेब आडके, दत्ताआण्णा शिंदे, नागेश अक्कलकोटे, कृष्णराज बारबोले, किरण देशमुख,ॲड. विकास जाधव, राजाभाऊ शेळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रामायणातील युद्धप्रसंगात मेघनादाच्या शक्तिबाणामुळे लक्ष्मण मूर्च्छित झाल्यानंतर त्यांचे प्राण वाचविण्यासाठी वैद्य सुषेण यांनी संजीवनी बुटी आणण्यास सांगितले. श्री हनुमान वेगाने द्रोणागिरी पर्वतावर पोहोचले, नेमकी वनस्पती ओळखता न आल्याने हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. या प्रसंगाचे सजीव चित्रण या हलत्या देखाव्यात करण्यात आले आहे.
मी स्वतः हनुमानभक्त असून कुस्तीवर प्रेम करणारा पैलवान आहे. अशा हनुमानाच्या देखाव्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले, याचा मला आनंद आहे, असे सांगत अस्लम काझी यांनी मंडळाचे आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार दिलीप सोपल म्हणाले की, व्यायाम आणि कुस्ती म्हटले की हनुमानाची उपासना केली जाते. लक्ष्मण मूर्च्छित झाल्यानंतर हनुमानाने संजीवनी आणून त्यांना जीवनदान दिले. आजच्या काळातही विविध कारणांनी ‘मूर्च्छित’ झालेल्या समाजघटकांना संजीवनी देऊन जागृत करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. कुस्तीपटू अस्लम काझी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याने हनुमानाच्या देखाव्याचे उद्घाटन ‘सक्षम हातांनी’ झाल्याचेही सोपल म्हणाले.
गणेशोत्सव आनंदाने व संयमाने साजरा करण्याचे आवाहन करत, सध्या दुष्काळाचे संकट असल्याने पावसासाठी सर्व धर्मीयांकडून श्रद्धेने प्रार्थना केली जात आहे. धरणे, ओढे, नाले व नद्या तुडुंब भराव्यात आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी सोपल यांनी केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनोज पवार, राहुल कोंढारे, नवनाथ माळगे, मनीष चौहान, दिनेश जाधव, सुशांत चव्हाण, रुपेश बंगाळे, आबा वाघमारे, किरण मक्के, रमेश पवार, रणजित कोंढारे, राहुल शिराळ, नागेश कडवे, सुरेश घंटे आदी उपस्थित होते.
Post Views: 6