अक्कलकोट – लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेला गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो एकतेचे प्रतीक असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात काढण्यात आली. यावेळी चेअरमन महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आमच्या विद्यार्थ्यांनी आज ज्या उत्साहात गणपती विसर्जन मिरवणूक काढली, त्याचे मला कौतुक वाटते.विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबतच आपली संस्कृती जपणे हे खूप महत्वाचे आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात यश, सुख आणि समृद्धी नांदो हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना असल्याचे मनोगत व्यक्त केले.
मिरवणुकीच्या प्रारंभी चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते गणरायाची आरती करून महानैवेद्य दाखविण्यात आला.
यानंतर उपस्थित सर्व भाविकांना व विद्यार्थ्यांना भोजन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशात मिरवणुकीत सहभाग घेऊन लेझीम खेळाचे सांघिक दर्शन घडविले.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही जय घोषणा देत मोठ्या भक्ती भावाने श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन महेश मालक इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे,
प्रथमेश मालक इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे सर, प्रा.विजय कुमार पवार सर, प्रा.देसाई सर, प्रा.गायकवाड सर, प्रा.कोरशेट्टी सर, आगरथडे सर, भावठाणकर सर, तन्मय इचगे, युवराज सोनटक्के, आदित्य गवंडी, समर्थ भोसले, अवधूत पवार, रमेश शिंदे सर, रजत गायकवाड, तुषार मोरे, अमोल महाडिक, लखन सुरवसे आदींसह संस्थेचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व इतर कर्मचारी वृंद तथा विद्यार्थी, विद्यार्थीनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 7