केवळ एवढ्यावरच न थांबता, आठ दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर एकनाथ जाधव यांच्या विहिरीवरील मोटर पंपाचा स्टार्टर चोरीला गेला. तसेच अकलूज रस्त्यानजीक घुमरे ओढ्याजवळून निलेश शिवाजी जाधव यांच्या शेतातून चार दिवसांपूर्वी ७.५ एचपीची मोटर चोरीला गेली. याच परिसरातून जयसिंग जाधव यांची गाय देखील चोरट्यांनी लांबवली आहे.
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तक्रार देऊनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी मळोली परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.”दोन महिन्यांत दोनदा विहिरीतील मोटर चोरीला गेल्याने माझे मोठे नुकसान झाले आहे.मळोली परिसरात सतत चोऱ्या होत असून पोलिसांकडे रीतसर तक्रार देऊनही काहीच तपास होत नसेल तर आम्ही दाद कोणाकडे मागायची? वेळापूर पोलिसांनी या चोऱ्यांचा त्वरित छडा लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”
— अभिजित जाधव (बाधित शेतकरी, मळोली)
















