कुर्डूवाडी – भारतासह जगभरात साजरा होत असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डूवाडी येथे दिनांक 21 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील सहशिक्षक श्री जयकुमार उपाध्ये यांनी योगासनाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह करून घेतले .
यामध्ये शवासन, वज्रासन, ताडासन ,शिर्षासन, मकरासन, सूर्यनमस्कार, कपालभाती, चक्रासन, हलासन, प्राणायाम, सर्वांगासन ,धनुरासन, भुजंगासन, पद्मासन अशी विविध प्रकारची आसने तसेच व्यायामाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
मुख्याध्यापिका श्रीम सारिका गोटे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून दररोज सकाळी योगा करण्याचे आवाहन केले.
संस्थापक अध्यक्ष शिवराज वायचळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी सचिव अजित वायचळ, मुख्याध्यापिका श्रीम. सारिका गोटे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.