अक्कलकोट – हजारो किलोमीटर वरून लोक स्वामीच्या दर्शनार्थ येतात . तीर्थक्षेत्र अक्कलकोट स्वामीच्या चरणी सेवा सादर करतात . आठच महिन्यापूर्वी अक्कलकोट हुन नांदेडला बदली झाली . पुन्हा अक्कलकोटवासीयांची सेवा करण्याची व स्वामी च्या सेवेची व स्वामीच्या दर्शन सेवेची संधी लाभली . हे माझे परम भाग्यच आहे असे भावपूर्ण गौरवोदगार विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांनी काढले .
विभागीय पोलीस अधिकारी विलास यामवार यांची पुणे येथे बदली झाली . अक्कलकोट विभागीय पोलीस अधिकारीपदी राजेंद्र टाकणे यांनी नुकताच पदभार स्विकारला . याप्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे बोलत होते .
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक दिपक भिताडे यांची सोलापुर येथे बदली झाली . यामुळे उत्तर पोलीस ठाण्यात पुर्ण वेळ पोलीस निरीक्षक म्हणून कुणाची नियुक्ती होणार ? अक्कलकोटवासीयांची सेवा स्वामी भक्ताची सेवा नित्य स्वामी दर्शनाची सेवा प्राप्त करण्यास कोण सरसावेल ? विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांनी अक्कलकोट वासीयांची सेवा स्वामी दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला पुन्हा लाभले हे परम भाग्याच आहे असे मानल . अशीच भावना व्यक्त करून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे पदभार घेण्याच्ये भाग्य कुणाला लाभेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिले आहे .
याकडे संपुर्ण तालुका वासीयांच लक्ष लागून राहिल आहे . स्वामी महाराज सेवा कोणाच्या हातून करून घेणार स्वामीची सेवा करण्याच भाग्य कुणाच्या नशिबी आहे स्वामीची पुनश्च सेवा करण्याचे भाग्य राजेंद्र टाकणे यानांच लाभले अशी भावना ही नागरिकातून व्यक्त होताना दिसत आहे .
Post Views: 7