सांगोला – पोलीस स्टेशन व सांगोला विद्यामंदिर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ जनजागृती मोहिमे अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिक्षक मकरंद अंकलगी व उज्वला कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक टिळेकर, स्नेहल चव्हाण, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासाहेब नरूटे, पर्यवेक्षिका शुभांगी घोंगडे उपस्थित होत्या. मनोगतात पोलिस उपनिरीक्षक संदीप गुरव यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी आरोग्य जपले पाहिजे. व्यसनांपासून दूर राहूनच तुम्ही उज्ज्वल भविष्य घडवू शकता. अंमली पदार्थापासून लांब राहा आणि समाजाला व्यसनमुक्त बनवण्यात हातभार लावा असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी इ.८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आरव बाबर प्रथम, फायजा मुलाणी द्वितीय, सोनाली मदने तृतीय तर गौरी लवटे, नम्रता मारकड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक अमोल उकळे व समाधान शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 6