सोलापूर- कुमठे येथील अतिशय क्षेत्र 1008 श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीने पर्युषण पर्वाची समाप्ती रविवारी जलयात्रा महोत्सवाने करण्यात येणार असून या महोत्सवाचे आयोजन विविध कार्यक्रमाने केले आहे .या जलयात्रा महोत्सवात सोलापुरातील सर्व श्रावक श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील उपाध्यक्ष नितीन कासार सचिव वालचंद पाटील यांनी केले आहे.
हा कार्यक्रम सकाळी 9:00 वाजता ध्वजारोहण 10:00 वाजता भगवंतास महा अभिषेक पूजा तर 12:00 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले असून दुपारी 4:00 वाजता 108 मंगल कलश व भगवंताची पालखी यांची भव्य मिरवणूक निघणार आहे यावेळी या कार्यक्रमात इंद्रा इंद्रायणीचा मान ऋषभ प्रवीण लोशी श्रेया ऋषभ दोशी, तसेच वैष्णवी प्रथमेश कासार प्रथमेश नितीन कासार यांना देण्यात आला असून पालखीचा उचलण्याचा मान महेश बालमुकुंद पाटील व मनोहर फुलचंद कासार यांना देण्यात आला आहे. मानाचा कुंभ ऐश्वर्या सगरे यांना देण्यात आला आहे.
येणाऱ्या सर्व श्रावक श्राविकांना भोजनाची व्यवस्था कै रमेश प्रथमशेट्टी यांच्या स्मरणार्थ रेणुका प्रथमशेट्टी यांनी केले आहे. यावेळी या कार्यक्रमात समाजातील विविध मान्यवरांचा सन्मान ही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपराव माने साहेब नगरसेवक जयकुमार माने माणिक स्वामी मंदिराचे डॉ.रंजीत गांधी पौरवी शिक्षण संस्थेचे डॉ. विलास हरपाळे कुमठे मंदिराचे मार्गदर्शक डॉ. महावीर शास्त्री डॉ. सिद्धांत गांधी डॉ. आदर्श मेहता डॉ. श्वेता शहा कुंभारी डॉ. रेश्मा मेहता जैन जनजागरणचे प्रा. मनीष शहा गांधीनाथा जैन मंगल प्रतिष्ठानचे संजय गांधी उद्योजक नूतन गांधी मातृयोग पावन समितीचे संजोग गांधी मुनीभक्त सुहास शहा बाहुबली मंदिर चे अध्यक्ष सुधीर पंडित आदिनाथ मंदिर चे सुनील गांधी कासार विकास प्रतिष्ठानचे हुकुमचंद हेसे उद्योजक राजकुमार दोशी, सुहास शहा, कासार मंदिराची विलास कंदले, उद्योजक महेश नळे आदींची उपस्थिती लाभणार असून या जलयात्र महोत्सवात जास्तीत जास्त श्रावक श्रावीकांनी उपस्थित राहावे असे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
—–
Post Views: 20