Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उन्हाळी सुट्ट्यां सुरु झाल्या तरी शहरातील जिजामाता आणि पद्मावती बागा बंदच

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
उन्हाळी सुट्ट्यां सुरु झाल्या तरी शहरातील जिजामाता आणि पद्मावती बागा बंदच
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या परीक्षा आता लवकरच संपतील आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. याकाळात बच्चेकंपनींचे करमणूकीचे तसेच मौजमाजेचे दिवस असतात. त्यांचे खेळण्या बागडण्याचे दिवस असतात. मात्र तरीही पंढरपूर येथील दोन्ही उद्याने किंवा बागा सध्या बंद अवस्थेत आहेत.  या मधील जिजामाता बागेचे तर नूतनीकरण करण्यात आलेले आहे. मात्र राजकीय श्रेयवादाच्या साठमारीत या बागेचे उदघाटन रखडले आहे. त्यामुळे शहरातील बच्चेकंपनींच्या मनोरंजनासाठी या दोन्ही बागा लवकर सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आता नागरिकांतून विशेषत: बच्चेकंपनींच्या पालकवर्गातून केली जात आहे.


पंढरपूर येथे जिजामाता उद्यान आणि पद्मावती बाग आहे, मात्र ही दोन्ही उद्याने कोरोना काळापासून साधारणपणे सहा सात वर्षे झाली तरीही बंद अवस्थेत आहेत.  यातील जिजामाता उद्यान सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करून सज्ज झाले आहे.  मात्र राजकीय श्रेयवाद आणि कुरघोडीच्या राजकारणात त्याचे उद्घाटन दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. जिजामाता ही बाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे.  या बागेत लहान मुलांसाठी नवीन खेळणी बसविण्यात आली आहेत विशेष म्हणजे हिरवीगार झाडी, हिरवळ याने समृद्ध असलेली ही बाग पन्नास वर्षांपेक्षा जुनी आहे.


पद्मावती उद्यान ही एक ऐतिहासिक वास्तू असून पेशवेकालीन बांधकाम एखाद्या पुरातन स्टेडियम सारखे आहे, दोन महिन्यांपूर्वी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली ही बाग स्वच्छ करण्यात आली तेव्हा शेकडो टन कचरा या बागेतून किंवा उद्यानातून काढण्यात आला. याठिकाणी सुंदर असे पद्मावती देवीचे मंदिर असून नवरात्रात येथे मोठी गर्दी असते. मध्यंतरीच्या काळात या उद्यानात रेल्वेबाबा गाडी, खेळणी बसविण्यात आलेली होती. मात्र सध्या त्याची पार वाट लागलेली दिसुन येते आहे. त्यामुळे या उद्यानाचे देखील नूतनीकरण करुन ही बाग शहरातील बच्चेकंपनीसाठी तसेच नागरिकांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण कसे होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  


जिजामाता उद्यान हे पूर्वी बुरडाची बाग म्हणून प्रसिद्ध होती. येथे सुंदर कारंजे होते. ससा, कासव, मोर, हरिण, मुंगूस असे पाळीव प्राणी देखील या बागेत असायचे. १९८०च्या दशकात ही बाग मनोरंजनाचे ठिकाण होते. अनेक व्याख्याने, सभा, नाटके या बागेत झाली असून सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील, उपनगरातील गर्भवती महिलांचे डोहाळजेवण व ईतर छोटे कार्यक्रम देखील या बागेतच पूर्वी होत असत. मुलांना खेळण्या बागडण्यासाठी एक उत्तम पर्याय ही बाग होती. त्यामुळे जिजामाता आणि पद्मावती या दोन्ही बागा उन्हाळी सुट्टीत सुरू कराव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांमधून विशेषत: पालकवर्गातून होत  आहे.
——————–
चौकट : ( मुलांनी खेळायचे कुठे हा प्रश्न )
राजकारण आता बास झाले. मुलांच्या करमणुकीसाठी बागा सुरू करण्यात याव्यात, कारण सुट्ट्या मध्ये मुलांनी कुठे खेळायचे हा प्रश्नच आहे. शहरातील सर्व मैदाने भाविकांच्या वाहनासाठी पार्किंग तळ झाली असून खेळण्यासाठी जागा नाहीत. शालेय मुले मोबाईल मध्ये गुंतत असून हे अत्यंत धोकादायक आहे, पब जी, फ्री फायर,रिल्स, अश्लिल साईट अशा मुळे मुले बिघडत चालली आहेत.
——————–
चौकट : ( नगराध्यक्षांनी पुढाकार घ्यावा )
पंढरपूर नगरपरिषदे मध्ये सध्या सत्तांतर झाले असून नगराध्यक्षपदी तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉ.प्रणिता भालके या काम पहात आहेत. मध्यंतरी त्यांनी स्वच्छता मोहिम हाती घेतलेली होती. या मध्ये पद्मावती उद्यानाची देखील स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसात पद्मावती बाग किंवा उद्यान सर्वसामान्यांसाठी खुली होणार असल्याच्या आशा काही प्रमाणात पल्लवीत झाल्या होत्या. मात्र स्वच्छतेनंतर पुन्हा बाग बंद अवस्थेत दिसून येत आहे. दरम्यान चार दिवसापूर्वीच नगराध्यक्षा डाँ.भालके यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नगराध्यक्षा प्रणिता भालकेंनीच पद्मावती बाग सुरु करण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण भाजपा आणि शिवसेना हे राज्याच्या सत्तेमधील भागीदार किंवा सत्तेतील मित्रपक्ष आहेत. त्यामुळे राजकीय श्रेयवादामुळे उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले जिजामाता उद्यानाचे देखील उदघाटन लवकरात लवकर कसे करता येईल हे नगराध्यक्षांनी पाहणे आवश्यक आहे.
————

फोटोओळी : पंढरपूर : शहरातील मध्यवर्ती असलेल्या जिजामाता उद्यानाचा सुमारे चार ते पाच कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी आकर्षक खेळणी बसविण्यात आलेली आहे. मात्र केवळ राजकीय श्रेयवादामुळे उद्घाटना अभावी ही जिजामाता उद्यान बाग सध्या बंद आहे.

Post Views: 49
Previous Post

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केली विविध ठिकाणची पाहणी 

Next Post

दादाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे भीम जयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दादाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे भीम जयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन

दादाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे भीम जयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन

ताज्या बातम्या

पोलिसांनी सात तासात मुलीला केले नातेवाईकांच्या स्वाधीन #solapurnews #news #marathinews

May 31, 2026

दिल्ली मुंबईसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट उधळला #viral #news

May 31, 2026

जरांगे पाटील यांनी मध्यरात्री १ वाजता उपोषण घेतले मागे #viral #news #marathinews

May 31, 2026

पीच तयार करताना रोलरखाली गेल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू #marathinews #news

May 31, 2026

आनंदोत्सवात साजरी झाली राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती

May 31, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

May 31, 2026
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

May 31, 2026

महापालिका शाळांमध्ये सोमवार पासून नव्या पाठ्यपुस्तकांचे बीटनिहाय वाटप

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0888181

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697