सोलापूर : दादाई बहुउद्देशीय समाज सेवी संस्थेच्या वतीने सेटलमेंट फ्रि.काॅलनी नं.1येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती संस्थापक अध्यक्ष युवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे आधारस्तंभ नारायण जाधव, भीमज्योत तरूण मंडळाचे मार्गदर्शक गौतम फडतरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कै.भगवान तात्या जाधव व कै.लायव्वा भगवान जाधव यांच्या स्मरणार्थ दादाई संस्थेच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भीमज्योत तरूण मंडळाचे अध्यक्ष राहुल एकमल्ले , अभिजीत फडतरे, संजय गायकवाड , विजय जाधव, निशांत गायकवाड, प्रकाश गायकवाड, मलेश सूर्यवंशी, भारत गायकवाड , निलेश गायकवाड, विवेक जाधव, संतोष गायकवाड, रमेश गायकवाड, समीर विजापुरे , रजाक विजापुरे , अजर शेख, कुणाल जाधव, प्रज्वल जाधव, श्रेयश गायकवाड, प्रथमेश जाधव आदी उपस्थित होते.


























