सोलापूर – जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने स्वर्गीय सुभाष भालचंद्र बुबणे यांच्या स्मरणार्थ ‘सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्ट रोजी मुळे पॅव्हेलियन पार्क स्टेडियम येथे होईल.
या स्पर्धेत १२, १४, १७ वर्षांखालील मुले व मुली, महिला गट तसेच ५० वर्षांपढील प्रौढ गटासाठी सामने होणार आहेत. मुलांच्या गटातील खेळाडूंना फक्त एकाच ग्रुपमध्ये खेळता येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता होईल, तर रात्री ७:०० वाजता सामन्यांना सुरुवात होईल. पहिल्या दिवशी (२२ ऑगस्ट) संध्याकाळी ७:०० वाजता १२ वर्षे (मुले/मुली), १४ वर्षे (मुली), १७ वर्षे (मुली) आणि महिला गटाचे सामने खेळवले जातील; तसेच रात्री ८:३० वाजता प्रौढ ऐकेरीचे सामने होणार आहेत. त्यानंतर रविवारी (२३ ऑगस्ट) १४ मुले, १७ मुले आणि सर्व अंतिम सामने पार पडतील.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रति खेळाडू १५० रुपये नोंदणी शुल्क संघटनेचे सचिव झेड. एम. पुणेकर यांच्याकडे ९४२३५३५८४० या नंबरवर ऑनलाईनने २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत पाठवावे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन संयोजक हर्षवर्धन बुबणे व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान यांनी केले आहे.
——-
























