करकंब – करकंब ता. पंढरपूर येथे करकंब गाव ते जळोली चौक दरम्यान धाकटी वेस या परिसरात ओढा आहे.या ओढ्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या बंधार्यांची उंची जास्त असल्या कारणाने सदर बंधारे भरल्यानंतर संबंधित पुलावर तीन ते चार फूट उंचीवरून पाणी वाहत होते.या ओढ्याच्या एका बाजूला जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तर दुसऱ्या बाजूस ओढ्यापासून ३०० मीटर अंतरावर माध्यमिक शाळा आहे.या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना या पुलावरून पाणी वाहत असताना त्यातून जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता.पुलावरती पाणी आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना पाण्यामुळे पलीकडे जाता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.करकंब येथील धाकटी वेस येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहिल्यानंतर धाकटी वेस ते जळोली चौकाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होत होता.त्यामुळे शालेय विद्यार्थी,शेतकरी,ग्रामस्थ, व्यापारी,विशेषतः अबाल वृद्ध,महिलांची प्रचंड गैरसोय निर्माण होऊन जीवितास धोका होण्याची शक्यताही निर्माण होत होती.जळोली चौक व त्या परिसरातील,नागरिक,शेतकरी, विद्यार्थ्यांना नेमतवाडी चौकात येऊन नंतर करकंब गावामध्ये दोन किलोमीटरचे अंतर पार करून यावे लागत होते.हा पूल झाल्यामुळे संबंधितांचा वेळ व त्रास वाचण्यास मदत होणार आहे.सदर पुलाची उंची वाढवून त्याची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी दैनिक तरुण भारतने वारंवार केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.या वृत्तांची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण करत सदर पुलाच्या कामाची पूर्तता केली. करकंब येथील अजितसिंह देशमुख मित्र मंडळाकडूनही तात्कालीन आमदार बबनदादा शिंदे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे या पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मा.आमदार बबनदादा शिंदे यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला.तर विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनीही विधिमंडळात मतदार संघातील हा प्रश्न मांडल्याने अखेर या पुलाची पूर्तता झाल्याने या रस्त्याचा व पुलाचा वापर करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी,नागरिक,महिलावर्ग, व्यापारी,अबालवृद्ध यांचा प्रवास निर्धोक होणार असून त्यामुळे त्यांच्याकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट.
दैनिक तरुण भारतने केला होता सातत्याने पाठपुरावा.
सदर पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व या मार्गावरील पुलाची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी यासाठी दैनिक तरुण भारतने दि.१७एप्रिल २०२५,दि.१ जानेवारी २०२५, दि.९ जून २०२४,दि.१०ऑक्टोंबर २०२२ च्या अंकांमध्ये या मार्गावरील सदर पुलाची उंची वाढवण्या संदर्भात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता.सदर पुलास मान्यता मिळावी व त्याची लवकरात लवकर पूर्तता करून या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी सातत्याने आवाज उठविला होता.त्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले.
चौकट.
सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे नागरिक,शेतकरी,ग्रामस्थ,विद्यार्थी, व्यापारी,महिला,अबालवृद्ध यांची होणारी गैरसोय दूर झाली असून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
चौकट.
सदर पुलाचे काम निश्चित कालावधी अगोदरच पूर्ण करण्यात यश आले आहे.पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी संबंधित पुलाच्या दोन्ही बाजूंककडील रस्त्याचे मुरमीकरण,खडीकरण व डांबरीकरण एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.सदरच्या पुलाचे काम व डांबरीकरण झाल्यानंतर नागरिक,ग्रामस्थ, विद्यार्थी,शेतकरी,अबालवृद्ध महिला यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
अजितसिंह देशमुख,अशोक सिंह देशमुख संबंधित कॉन्ट्रॅक्टर.
Post Views: 5