सोलापूर : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन’च्या वतीने आणि ‘नाकोडा व स्वामित्व ग्रुप’चे चेअरमन बाबुभाई मेहता यांच्या सौजन्याने तयार करण्यात आलेल्या योग पुस्तिकेचे आज ‘सरस्वती मंदिर स.हि.ने. प्रशाला’ येथे प्रकाशन करण्यात आले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका निता येरमाकर, पर्यवेक्षक मुकुंद गिरी, क्रीडा शिक्षक वीरेश अंगडी, योग व संमोहनतज्ञ क्रांतीवीर महिंद्रकर, जैन सोशल ग्रुपच्या सौ. बंम व विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुस्तिकेचे विमोचन झाले. या पुस्तिकेत योग मुद्रा, सूर्यनमस्कार व प्रोटोकॉलनुसार योगासनांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. याप्रसंगी क्रांतीवीर महिंद्रकर यांनी विद्यार्थ्यांना योग मुद्रेचे महत्त्व समजावून सांगितले.






















