सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगाोला) येथील प्रा.डॉ.सुनयना माळी, डॉ.औदुंबर माळी व प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी पिसिआय, नवी दिल्ली यांच्या एनईपी-२०२० च्या मार्गदर्शक नियमानुसार फार्मासुटिकल इनऑरगॅनिक अँड ऍनालीटीकल केमिस्ट्री या बी.फार्मसी प्रथम वर्षाच्या प्रॅक्टिकल नवीन अभ्यासक्रमाच्या विषयावर पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक निराली पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये औषधाच्या विश्लेषणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती व त्यांचा फार्मसी क्षेत्रास होणारा फायदा याचा समावेश केला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व लाभ होणार आहे. या यशाबद्दल संस्था अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.