सोलापूर : ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथपाल दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ व्ही व्ही पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ व्ही व्ही पोतदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वाचन म्हणजे वैचारिक प्रक्रियेला चालना देणे होय” वाचनामुळे आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. “Books :White background & black words… become life colorful ,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा दिली. वाचनाच्या माध्यमातून भविष्यातील स्वप्ने सहजपणे साकार करता येतात, असेही त्यांनी सांगितले. काय वाचावे आणि कसे वाचावे, याचे मार्गदर्शन करताना त्यांनी विविध लेखक व पुस्तकांची उदाहरणे दिली. शैक्षणिक प्रगतीसोबतच वाचनामुळे व्यक्तिमत्त्व कसे समृद्ध होते, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी वर्षातून किमान 3 पुस्तक वाचण्याचा संकल्प करून खऱ्या अर्थाने डॉ. एस. आर. रंगनाथन यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनातून वाचन संस्कृतीची जोपासना तसेच या प्रक्रियेत ग्रंथपालाची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
सर्वोत्कृष्ट ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) शिक्षकांमधून उत्कृष्ट ग्रंथालय वापरकर्त्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापिका जे. सी. सचदेव, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक श्री. आर. पी. म्हंता आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक श्री. एस. बी. पांढरे यांना प्रदान करण्यात आले.
तसेच सर्वोत्कृष्ट ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट ग्रंथालय वापरकर्त्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नेहा कुलकर्णी तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनिअरिंग विभाग, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हौसाबाई जाधव तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनिअरिंग विभाग, आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्रुष्टी जाधव द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनिअरिंग विभाग यांना प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा ग्रंथालयाकडे जास्तीत जास्त कल असावा, त्यांना ग्रंथालयातील माहितीचा परिपूर्ण लाभ मिळावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2026–2027 मध्ये मध्यवर्ती ग्रंथालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी “ग्रंथालय रोजनिशी उपक्रम (Library Diary Activity)” राबविण्यात आली.
या उपक्रमामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिव्या तांबे द्वितीय वर्ष कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभाग, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रुती घोडके द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुश्री द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजिनिअरिंग विभाग मादास यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले व उपप्राचार्य श्री एस के मोहिते यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले, ग्रंथपाल सौ. एस. व्ही. कस्तुरे, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी रागिणी बंडगर आणि आकांक्षा समाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील विभागातील प्राध्यापक श्री. जे. जी. मुल्ला यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रंथपाल सौ. एस. व्ही. कस्तुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















